Quantcast
Channel: Fitness fatigue - Feed
Viewing all articles
Browse latest Browse all 54

या ५ गोष्टींमुळे भविष्यात तरुणांनाही आर्थ्राटीसचा धोका वाढू शकतो.

$
0
0
आर्थ्राटीस ही एक गंभीर समस्या आहे.पण याचा त्रास फक्त वृद्धांनाच होतो असा गैरसमज झाल्यामुळे तरुणांना ही समस्या आपल्याला होणार नाही असे वाटत असते.लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या सांध्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ही समस्या तुम्हाला तरुणपणी देखील होऊ शकते.यासाठी या विकाराची काही लक्षणे जरुर जाणून घ्या.केवळ शारीरिकच नाही तर इतर काही लक्षणे देखील तुम्हाला आर्थ्राटीसचा धोका असल्याचे दर्शवित असतात.तसेच जाणून घ्या आर्थ्राटीसवर होमिओपॅथी उपचार घ्यावेत का ? १.आर्थ्राटीसची हिस्ट्री असणे-ऑर्थोपेडीक सर्जन व गुडघा,पाय व घोटा सर्जरी स्पेशलीस्ट डॉ.प्रदीप मोनूट यांच्या मते जर तुमच्या आईवडीलांना सांधेदुखीची समस्या असेल तर तुम्हाला बोन डेनसिटी टेस्ट अथवा ब्लड टेस्ट करुन तुमची बोन डेनसिटी तपासणे आवश्यक आहे.कारण आईवडीलांना आर्थ्राटीस असल्यास तो तुम्हाला होण्याची दाट शक्यता असते.असे काही आनुवंशिक व पर्यावरणविषयक घटक असतात ज्यामुळे तुम्हाला तीव्र रुमटॉइड आर्थ्राटीस होण्याचा धोका असू शकतो.त्यामुळे असे असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या व तुम्हाला या विकारापासून वाचवा. २.अतिवजन असणे-आजकाल बदलेल्या जीवनशैली मुळे अतिलठ्ठपणा ही सामान्य समस्या झाली आहे.डॉ.मोनूट यांच्यामते अतिवजनामुळे तुमच्या  वजनाचा भार हळूहळू तुमच्या गुडघा व घोट्याच्या सांध्यावर पडतो.त्यामुळे तुम्हाला सांधेदुखीची समस्या निर्माण होते.त्यामुळे आर्थ्राटीस टाळण्यासाठी तुमचे वजन कमी करा व सांध्यांची योग्य काळजी घ्या.सायकलींग व स्विमींग मुळे तुमच्या सांध्यांना चांगला व्यायाम मिळेल.यासाठी जाणून घ्या झटपट वजन कमी करण्याचे 5 सुपरहिट फंडे ! ३.मॉर्निंग स्टीफनेस-जर सकाळी उठल्यावर तुम्हाला बराच वेळ हालचाल करणे कठीण जात असेल तर याबाबत तुम्ही सावध रहाणे फार गरजेचे आहे.तसेच सोफा अथवा लादीवर बराच काळ बसल्यावर त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.जर तुम्हाला सांधे जखडण्याची समस्या जाणवत असेल तर ब्लड टेस्ट व एक्स-रे करुन सांधेदुखीची समस्या जाणून घ्या.कधीकधी व्हिटॅमिन बी ३ च्या कमतरतेमुळे देखील ही समस्या तुम्हाला जाणवू शकते. ४.सांधेदुखी-चालताना,बसताना अथवा पाय-या चढता-उतरताना तुम्हाला सांधेदुखी जाणवत असेल तर हे आर्थ्राटीसचे एक लक्षण असू शकते.कधीकधी या वेदनेमुळे तुम्हाला झोप देखील लागत नाही.यासाठी जाणून घ्या एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय ५.थकवा-थकवा हे आर्थ्राटीसचे एक लक्षण असू शकते.जर तुम्हाला सांधेदुखीसह ताप व सतत थकवा जाणवत असेल तर हे आर्थ्राटीसचे लक्षण आहे.मात्र ब-याचदा लोक या लक्षणाकडे तापाचे एक लक्षण म्हणून दुर्लक्ष करतात.त्यामुळे असे वारंवार होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या. तसेच जाणून घ्या साधे सांध्यांचे दुखणे अर्थ्राईटीसच्या त्रासापासून या ’6′ लक्षणांनी वेगळे ठरते !   Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 54

Latest Images

Trending Articles



Latest Images